भूम (प्रतिनिधी)-  आचार्य विद्यासागरजी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूम या ठिकाणी 2024 मध्ये उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना पदवीदान समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया भूम या शाखेचे मॅनेजर राधेश्याम सोनटक्के  तसेच अरुण देशमुख हे उपस्थित होते. 2024 मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेमध्ये पत्रेकारागीर, संधाता व तारतंत्री या व्यवसायाच्या प्रथम तीन प्रशिक्षणार्थ्यांना यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदवीदान /प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तारतंत्री व्यवसायाच्या सोमनाथ नागरगोजे या प्रशिक्षणार्थ्यांने 91.37  टक्के मिळवून संस्थेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 

संस्थेचे प्राचार्य हर्षद राजूरकर यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्प निदेशक दिनेश मुळे यांनी केले. आभार प्रदर्शन शिल्पनिदेशक प्रणय भोंडेकर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी गटनिदेशक जितेंद्र बांगर तसेच  शेरताटे वाय. एस., अनिकेत  खिल्लारे, सुजित आगाव, हर्षद कळबंड,अवधूत  गवळी, जाधवर आदी कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

 
Top