तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्याची पाच वर्षात प्रगती होण्या ऐवजी अधोगत झाल्याचे सांगुन मागील काही दिवसात केलेल्या विकास कामांचे पुतळे व स्मारक कामांचे उदघाटने हा प्रकार समाजांची दिशाभुल करणारा व बेगाना शादी मे अब्दुला दिवाना असा असल्याचे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष  अँड. धिरज पाटील, रुषीकेश मगर, अमोल कुतवळ यांनी पञकार परिषद घेऊन सत्ताधारीवर केला.

यावेळी बोलताना ही मंडळी पुढे म्हणाले की, तुळजापूर विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी घोटाळा चौकशी निवडणुक आयोगाने करण्याची मागणी  केली.

या विधानसभा मतदार संघात परराज्यातील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचा प्रयत्न झाला. सध्या 6200 नोंदणी रद्द केले असुन अजुनही ही प्रक्रिया चालु आहे. या प्रकरणी आम्ही  निवडणूक निर्णय अधिकारी  पातळीवर  या घोटाळ्यातील मास्टर माईंडवर कारवाई झाली  नाहीतर माञ आम्ही राज्य निवडणुक निर्णय अधिकारीकडे दाद  मागणार  आहोत. या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार  यांच्याकडे हा प्रश्न मांडुन हा घोटाळा राज्य पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणार असल्याने अधिकारी वर्गाने कुणच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी. तालुक्यात महामानवांचे पुतळे, स्मारके यांना आमचा विरोध नाही पण ना जागा, निधी टेंडर हे काहीही न करता शेवटच्या चार दिवसात प्रशासनातील एकही अधिकारी, साधा कर्मचारी उपस्थितीत नसताना स्वताःच उदघाटने करणे म्हणजे बेगाना शादी मे अब्दुल्ला दिवाणा असा प्रकार असल्याचे स्पष्ट केले. तिर्थक्षेञ तुळजापूर विकासाठी केंद्र, राज्य शासनाचा  निधी न आणता भाविकांनी दान केलेल्या रकमेतील 54 कोटी रुपयाच्या कामाचे आचारसंहिता लागण्यापुर्वी मंदीर प्रशासनातील एकही अधिकारी उपस्थितीत नसताना स्वताःच उदघाटने करणे याला काय म्हणायाचे. पुण्यश्लोक  आहिल्यादेवीने बांधलेली चांगल्या अवस्थेतील वापरातील विहिराची प्रचंड दुरावस्था झालेली असताना तीचा जिर्णौध्दर करायाचे सोडुन नवीन स्मारकांची उदघाटने करीत फिरायाचे ही यांची महापुरुषां बाबतीत मानसिकता. कृष्णा खो-याचे पाणी तिर्थक्षेञ खळखळणार म्हणणा-यांनी पाणी आणले का याचे आदि उत्तर द्यावे असे यावेळी आवाहन केले.

तुळजापूर विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेसला सुटणार आहे. काँग्रेसमध्ये असणाऱ्यानाच उमेदवारी मिळणार आहे. दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवाराला उमेदवारी मिळणार किंवा दिली तर त्या बाबतीत त्यावेळी काय करायाचे याचा निर्णय घेऊ असे शेवटी म्हणाले.


 
Top