धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या आठवडयात परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेले सोयाबिन पिके बऱ्याच ठिकाणी पाण्याखाली जावून शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने पिकवलेले पिक पाण्यामध्ये वाया जाण्याची परिस्थीती निर्माण झाली आहे. उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, पेटसांगवी येथे मोठया प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने शेतात पाणी साठून सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर लेट खरीप हंगामामध्ये कांद्याची शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर लागवड केली आहे. सदर पावसामुळे कांदा पिक पाणी साठून वाया जाण्याच्या परिस्थीतीत असल्याने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जावून पिकांची पहाणी केली.

 त्यानंतर महसुल प्रशासनास नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे तात्काळ करणेबाबत सुचना व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

 यावेळी  शिवसेना नेते बसवराज वरनाळे,तालुका प्रमुख  बाबुराव शहापुरे, तालुकाप्रमुख लोहारा अमोल बिराजदार ,विधानसभा प्रमुख भगवान मामा जाधव,माजी नगराध्यक्ष रजाक भाई आत्तार, सुधाकर पाटील, रणधीर भाऊ सूर्यवंशी, विरपाक्ष स्वामी ,आशोक राजे सरवदे तहसीलदार येरमे, तालुका कृषि अधिकारी रितापुरे विमा प्रतिनिधी, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top