धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, धाराशिव तालुका शाखेची बैठक राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर व राज्य कार्यकारिणी सदस्य बशीर तांबोळी, सविताताई पांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्या प्रशाला धाराशिव येथे नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये धाराशिव तालुक्याची नुतन कार्यकारिणी तसेच जिल्हा शाखेवरील पदाधिकारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
धाराशिव तालुका नुतन कार्यकारिणी तालुका नेते: सुरेश त्रिंबक भालेराव (प्रा शा इर्ला), तालुकाध्यक्ष: नागनाथ मुडबे (प्रा. शा. तोरंबा), सरचिटणीस: बालाजी सुभाष निंबाळकर (प्रा शा कारी), कार्याध्यक्ष सुधीर अर्जुन पवार (के प्रा शा बावी), कोषाध्यक्ष पवण कल्याण क्षिरसागर (ईर्ला), उपाध्यक्ष: लक्ष्मण तात्या घोडके (सुर्डी),धम्मदीप सवई (येवती), संघटक नितीन विष्णूपंत सलगरे.
जिल्हा कार्यकारिणीवर निवडलेले पदाधिकारी- जिल्हा उपाध्यक्ष मालोजी वाघमारे, जिल्हा सहसचिव राजेंद्र आकोसकर, जिल्हा चिटणीस संतोष गोविंदराव डोके, जिल्हा संघटक दिपक तानाजी ठोंबरे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब यादवराव कांबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रवीण प्रल्हाद गाडे यांची निवड करण्यात आली. नवीन निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांना सर्वांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे, महेबूब काझी, बाळकृष्ण पाटील, नवनाथ चौरे, सतीश ढोणे, शिवाजी साखरे, संजय गाडेकर, दयानंद जेटीथोर, महेंद्र रणदिवे, मिलिंद जानराव, विलास ताकपिरे, बाळासाहेब माने, सुधीर गायकवाड, श्रीहरी बिडवे, लहू जगताप, करडखेले सर, मारूती काळे आदी सह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.