कळंब (प्रतिनिधी)- शहरातील माजी सैनिक सहकारी पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिक्षकभवन येथे दि. 28 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार  पडली. सर्व  माजीसैनिक सभासदांना एका माळेत गुंफून घेण्यासाठी धाडसाने निर्णय घेवून अनमोल गिफ्ट देवून माजीसैनिक व विरमाता, पत्नी या सभासदांचा गौरव केला. या सर्वसाधारण सभेत सर्व माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेण्यात आले. 

या बैठकीसाठी पतसंस्थेचे चेअरमन सत्यनारायण पुरी, व्हाईस चेअरमन रामजीवन बोंदर,संचालक अरुण आगवान, अनिल पवार, रवींद्र जाधव, सोनाजी राजे, भागवत दौंड, बाळासाहेब व्होंडे, मधुकर कांबळे, अंकुश तांबारे, शिवगंगा वरपे, किरण शेळके, अर्चना हुलूळे, सचिव श्रीकांत पाटील, उत्तम जाधव, धालगडे आदी उपस्थित होते . 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाजी राजे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रामजीवन बोंदर यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होऊन भारत माता की जय,वंदे मातरम्‌‍ : अशा घोषणा देऊन या बैठकीची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अनेक माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top