तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक सुरु

तुळजापूर - येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती त खरीप शेतमालाची आवक सुरु झाली आहे.ही अशीच आवक मार्च पर्यत अशीच राहण्याची शक्यता आहे दिवाळी पुर्वी आवक आणखी वाढण्याचीशक्यता आहे.सध्या सोयाबीन ची २००क्विंटल आवक असुन सोमवार सोयाबीन दर ४३००रुपये निघाला  तसेच उडीद आवक ४०क्विंटल असुन त्याचा दर ७३००रुपये आहे.जुनी ज्वारी आवक ४०क्विंटल असुन त्याचा दर ३हजार आसपास निघाला आहे. तरी शेतकऱ्यांनी शेतमाल वाळवुन काडी कचरा विरहीत बाजार समितीत विक्रीस आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजारसमितीने केले आहे.

सेस दर घटवला 

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने  अधिसुचना काढुन सेस दर कमी केला आहे  महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ क्र.अधिसु-०४२४/प्र.क्र. २२६/२१- स- महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ (१९६४ चा महा. २०) च्या कलम ३१ च्या उपकलम (१) अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन शासन अधिसूचना क्र. एपीएम १०८६/४४४९२/४५२/११-स, दि. ०७/१०/१९८६ अधिक्रमित करण्यात येत असून, या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र शासन कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून बाजार क्षेत्रातील खरेदी विक्री केलेल्या कृषि उत्पन्नाच्या प्रत्येकी शंभर रुपयाच्या खरेदीवर किमान पंचवीस पैसे व कमाल पन्नास पैसे असा दर निश्चित करण्यात येत आहे.असे आदेश संतोष ज्ञा. देशमुख शासनाचे उपसचिव यांनी काढला आहे  याचा लाभ शेतकरी कि व्यापारी वर्गास होणार हे लवकरच कळणार आहे यामुळे माञ कृषी उत्पन्न बाजारसमिती उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली जातआहे

आँनलाईन नोंदणी सुरु  

शाषण हमी भाव नुसार सोयाबीन आ़ँनलाईन विक्री   नोंदणी शनिवार पासुन सुरु  करण्यात आली असुन आजपर्यत चाळीस शेतकऱ्यांनी आँनलाईन नोंदणी केली आहे तरी ज्यांना आँनलाईन शाषण हमी भावाने विक्री  करावयाची  आहे त्यांनी आई झेराँक्स अँक्सेस बँक  जवळ येथे नोंदणी करावी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहीती सभापती सुनिल जाधव यांनी दिली.

 
Top