धाराशिव (प्रतिनिधी)-श्री क्षेत्र नारायणगड जि. बीड येथे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत 12 ऑक्टोबर दुपारी 12:00 वाजता दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळावा नियोजनासाठी धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाजाकडून गावोगावी बैठकाचे आयोजन करण्यास सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात सोमवार दि.30 सप्टेंबर आळणी व कुमाळवाडी या गावापासून करण्यात आली. यावेळी धाराशिव सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी जमलेल्या समाज बांधवांना मनोज जरांगे पाटलांची भूमिका तसेच श्री क्षेत्र नारायण गड दसरा मेळाव्यासाठी का येणं गरजेचं आहे हेही यावेळी पटवून सांगितले. सर्वच राजकीय पक्षाची नेते मंडळी कशी बोटचेपी भूमिका घेतात, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी कोणीही पत्र देत नाहीत हेही यावेळी वास्तव मांडण्यात आले.
तसेच यावेळी जमलेल्या समाज बांधवांनी जरांगे पाटील जी भूमिका घेतील ती भूमिका मान्य असल्याचे एक मुखाने सांगण्यात आले. या बैठकीसाठी आळणी व कुमाळवाडी गावातील हनुमानाच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी केली झाली होती.