तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य पवार म्हणाले की, प्रत्येक परिवाराचा मुख्य आधार आईच असते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हा देखील एक परिवारच आहे,या परिवाराचा पाया शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या खांद्याला खांदा लावून संस्था माता सुशिलादेवी साळुंखे यांनी रचला.  बहुजन समाज हा शिक्षीत होऊन पुढे गेला पाहिजे हा मुळ विचार मनाशी बाळगून सुशिलादेवींनी विद्यार्थी स्वतःच्या मुला बाळांप्रमाणे सांभाळले. पूर्वीची जी शिक्षण घेतलीली पिढि आहे त्यांनी महाराष्ट्र आणि देश सांभाळला, संस्थामाता हा केवळ शब्द नसुन हा शब्द एक उपाधी आहे. त्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सुशिक्षित करणाऱ्या माता आहेत. कारण सकारात्मक शैक्षणिक विचार त्यांनी पुढे घेऊन जाण्याचा मानस त्यांनी शेवटपर्यंत जपला. आज समाजाला विचार माहीत आहेत पण ते समाजामार्फत पुढे घेऊन जाण्याचे काम करताना कोणी दिसुन येत नाही. अशावेळी या माऊलीची निश्चितच आठवण येते. कारण प्रतिकुल परीस्थितीतुनच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची पायाभरणी झालेली आहे. ही संस्था एक संस्था नसून ती एका ज्ञानमंदीरप्रमाणे दिमाखात उभा आहे. या मंदिराच्या पायाभरणीची मुळ विट जी दृष्टीस येत नाही पण अस्तित्वात आहे याची जाणीव आपणांस असणे गरजेचे आहे असे मत प्राचार्य पवार यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच सदर प्रसंगी लोकप्रिय नेते नरेंद्र बोरगांवकर, सदस्य महाविद्यालय विकास समिती यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. जे. कुकडे यांनी केले. तर आभार प्रा. व्ही. एच. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top