नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापुर तालुक्याचा अतिवृष्टी अनुदानामध्ये समावेश करावा अशी मागणी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
तुळजापुर तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजही चिखलामुळे सोयाबीन काढतांना अडचण येत आहे.अशी तालुक्यात परस्थिती असतांना अतिवृष्टी अनुदानाच्या बाबतीत तुळजापुर तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर खुप मोठा अन्याय होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून तुळजापुर तालुक्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातुन तुळजापुर तालुक्याचा अतिवृष्टी अनुदान यादीमध्ये समावेश करून तुळजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मंजुर करून शेतकऱ्यांना दिलास द्यावा अशी मागणी या निवेदनात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे.