नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने इयत्ता दहावी, बारावी,मेडिकल व इंजीनियरिंग प्रवेश परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये तेजस्विनी सुरवसे, श्रुती विभुते, सानिका मुळे, राजनंदिनी भोसले,स्वरा येडगे, अश्वेता गायकवाड, रेणुका चव्हाण,अनुष्का गायकवाड, प्रबोधिनी बनसोडे,नम्रता गोगावे, कु.रुक्सार शेख, आदित्य बनसोडे, आकाश पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांसह वाघमारे, सुर्यवंशी, कुंभार, गायकवाड, वैष्णवी कुलकर्णी, सुरेखा मोरे, विद्या विभूते,संगीता चिमणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे खंबीर नेतृत्व दिनेश बंडगर, जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धेश्वर विभुते, डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष  मारुती खारवे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब बनसोडे, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, सदन व्यापारी मदन घोडके, अभियंता बागडे, विद्यार्थी वाहतुक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष विधाते, मुख्याध्यापक गायकवाड आदीजन उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धेश्वर विभुते यांनी केले. जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप दिनेश बंडगर यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दीपिका स्वामी यांनी केले. तर आभार वाघमारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती खारवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 
Top