परंडा (प्रतिनिधी) -  श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथील वनस्पतीशास्त्र विभागाचा संशोधक विद्यार्थी रणजीत श्रीमंत भागडे यांना वनस्पतीशास्त्र मधील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी सहारा चॅरिटेबल ट्रस्ट या राष्ट्रीय संस्थेने डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम पुरस्कार देऊन सन्मानित केले.

रणजीत भागडे हे गेल्या तीन वर्षापासून वनस्पती शास्त्रामध्ये संशोधन करत आहेत. त्यांनी डायव्हर्सिटी अँड रिस्पॉन्स ऑफ अरबीस्क्युलर मायकोरायझल  फन्जाय ऑन सम कॅश क्रॉप प्लांट्स ऑफ मराठवाडा या विषयावर ते संशोधन करत आहेत. त्यांना वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक डॉ. प्रकाश सरवदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मराठवाड्यातील प्रमुख तीन पिकावर ऊस, कापूस व केळी यावर ते संशोधन करत आहेत. 

 
Top