धाराशिव (प्रतिनिधी)-  विधानसभा  सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग धाराशिवच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.या कारवाईत 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्ह्यात विविध ठिकाणी 1 ऑक्टोबरपासून 88 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक - 2024 कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून,आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे.आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग धाराशिव कार्यालयाच्या वतीने अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्रीवर पूर्ण प्रतिबंध करण्याकरिता कठोर कारवाई करणे सुरु केले आहे. ही कारवाई 1 ऑक्टोबरपासूनच सुरू करण्यात आली आहे.

15 ऑक्टोबरपर्यंत  88 गुन्हे नोंदविले आले आहेत.या गुन्ह्यांतील 80 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.2 वाहने जप्त करण्यात आली आहे.राज्य उत्पादन विभागाच्या जिल्हयात करण्यात आलेल्या कारवाईत हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 27 हजार 300 लिटर रसायन जप्त केले आहे. तर 1845 लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली आहे.यात देशी दारु 209.78 लिटर,विदेशी दारु 95.76 लिटर,ताडी 1565 लिटर असा सर्व मिळून 15 लाख 29 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसचे आचारसंहिता कालावधीमध्ये अवैध मद्य,अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीवर कठोर कारवाई करण्याच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.


 
Top