तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान तर्फ शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर रोजी भाविकांना अन्नदान महाप्रसाद वाटप संपन्न झाला.
प्रथमता या अन्नदान महाप्रसाद चा नैवध देविला दाखविल्या नंतर तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन माया माने यांच्या हस्ते अन्नदान, महाप्रसाद पुजन केल्यानंतर भाविकांना वाटप करण्यात आले. यावेळी लेखापाल सिध्देश्वर इंतुले, अभियंता भोसले, अमोल भोसले, नागेश शितोळे, मार्तड दिक्षित, विश्वास परमेश्वर, अंबादास औटी सह मंदिराचे अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते.