वाशी (प्रतिनिधी)- येथील हारून जमालोद्दीन काझी यांचे वयाच्या 64 व्या वर्षी सोमवारी सायंकाळी 5.15 वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या आयुष्याच्या एकंदरीत प्रवसात त्यांनी पत्रकार, वाशी चे पोलीस पाटील तसेच ते ज्येष्ठ नागरिक संघटनेचे विद्यमान तालुकाध्यक्ष होते. त्यांचा शहरासह तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार होता. मंगळवारी (दि.2) कण्हेरी रस्त्यालगत असलेल्या काझी कब्रस्थान येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन विवाहित मुले,नातवंडे असा परिवार आहे. पु.वि. लोकराज्यचे प्रतिनिधी शोएब काझी यांचे ते वडील होते.