तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी मंदिरात प्रत्येक सण पारंपारिक पध्दतीने साजरा होत असतो. सोमवारी दि. 2 सप्टेंबर रोजी बैलपोळ्या निमित्त तुळजाभवानी मंदिरात गाय व बैलाचे लग्न लागून बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. 

महंत तुकोजीबुवा यांचे परंपरेनुसार गाय-बैल तुळजाभवानी मंदिरात बैलपोळ्यानिमित्त नेले जाते. यावर्षी पण गाय-बैल सजवून तुळजाभवानी मंदिरात नेले गेले. मंदिरात परंपरेनुसार अक्षदा टाकून गाय-बैलाचे लग्न लावण्यात आले. त्यानंतर वाजत-गाजत मिरवणुकीने बैल नेण्यात आले. मंदीरात बैलाचे पुजन करताना देविचे महंत तुकोजीबुवा महंत  हमरोजी बुवा महंत वाकोजी बुवा सहाय्यक  धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले उपस्थित होते.

 
Top