मुरुम (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत कळंब येथील मोहेकर महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन धाराशिव झोन बॅडमिंटन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत मुरुमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील अनिकेत इंगोले (बी. एस्सी. द्वितीय वर्ष) मुलांमध्ये प्रथम तर कुमारी मयुरी जाधव (बी. सी. एस. तृतीय वर्ष) व स्मिता चौधरी (बी. ए. तृतीय वर्ष) मुलींचा संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
या यशस्वी खेळाडूंचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, क्रीडा शिक्षक प्रा. नारायण सोलंकर, प्रा. डॉ. राजेंद्र गणापूरे, डॉ. भिलसिंग जाधव, डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. रमेश आडे, गोपाळ इंगोले आदींनी त्यांचे कौतुक करून विशेष अभिनंदन केले.