धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील श्री ची पूजविधि आमदार विक्रम काळे, जिल्हा पोलीस प्रमुख संजय जाधव व माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार काळे यांच्या हस्ते मुर्तीकार काशिनाथ दिवटे यांचा सन्मान करण्यात आला.
पौराणिक,अध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक व विविध ज्वलंत समस्येवर अनेक हलते देखावे या जिल्ह्यांमध्ये सुरू करणारे बाल हनुमान गणेश मंडळ आहे. असे उद्गार आमदार काळे यांनी काढले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संजय जाधव, नानासाहेब पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मालखरे गिरीश, डॉ. विधाते तुकाराम, सुनील मिसाळ शशी माने व विनोद माने, अनंत कुऱ्हाडे, श्रीमती अंजली पतंगे यांचासह प्रमुख पाहुण्यांचा मंडळाच्या वतीने मनमत पाळणे, प्रा. भालचंद्र हुच्चे, गजानन गवळी, नंदकुमार हुच्चे यांनी सत्कार केला. यावेळी विद्या साखरे, संजय-बसवेश्वर पाळणे अतुल ढोकर, दुर्गेश दिवटे, वरून साळुंखे, श्रीकांत दिवटे, मनोज अंजि खाणे मुझे मिल पठाण आदी उपस्थित होते.