भूम (प्रतिनिधी)-अंबी येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातून 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये डोके आर्यन कृष्णा प्रथम क्रमांक, 17 वर्षे वयोगटातून गोळा फेक स्पर्धेत कुमार उगलमुगले श्रेयस सुनील याने प्रथम क्रमांक मिळवला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी 14 वर्षे वयोगटातून घावटे संस्कृती दिलीप हिने अडथळा स्पर्धेत प्रथन क्रमांक मिळविला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड वरील सर्व खेळाडूंची निवड झाली आहे. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या सर्व खेळाडूचे संस्थेचे सचिव व पर्यवेक्षक सतीशराव देशमुख, मुख्याध्यापक दत्ता भालेराव, क्रीडा शिक्षक मिसाळ आप्पा व शिंदे जयंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.