धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले जात असुन महिन्याच्या प्रत्येक 26 तारखेला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्यान आयोजित करण्यात येते. आज रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये डाएटचे प्राचार्य डॉ दयानंद जटनुरे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमात संविधान मंदिर येथील संविधान उद्देशिकाच्या प्रतीला पुष्प अर्पण व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. मान्यवरांचे स्वागत औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिवचे प्राचार्य एम एस बिरादार व इतर शिक्षक वर्ग यांनी केले.
व्याख्यानाचा विषय होता भारत व संविधान, डॉ दयानंद जटनुरे यांनी प्राचिन भारत संस्कृती, परकीयांची आक्रमणे, ब्रिटिश सरकारचे कायदे आणि भारतीय संविधानातील कायदे विषयक मार्गदर्शन केले,मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना त्यांनी भारतीय संविधान उद्देशिकातील आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम याबद्दलचे चर्चा सत्रही केले. आत्तापर्यंत 107 वेळा घटनेत दुरुस्ती केली असुन मुळ राज्य घटना कोणालाही कदापि बदलता येणार नाही असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. प्राचार्य एम एस बिरादार यांनी स्वागत व आभारप्रदर्शन करतांना संविधान विषयी जागरुकता राहुन भारतीय संविधान अमृतमहोत्सव आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे. संविधान आपणाला जगायला शिकविते असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव,प्रमुख पाहुणे पुरातत्त्वज्ञ व इतिहासकार रविंद्र शिंदे,डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त विजय गायकवाड,ॲड अजय वागाळे, तर मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतिफ,उपाध्यक्ष गणेश वाघमारे, संघटक संजय गजधने, कोषाध्यक्ष रऊफ शेख, सदस्य बाबासाहेब गुळीग, पत्रकार श्रीकांत गायकवाड, बलभीम कांबळे,बि के बनसोडे, छत्रपाल वाघमारे, तर शिक्षक कर्मचारी वर्ग किरण झरकर, पी एस गाडेकर, एफ बी जगताप, बालाजी वाघमारे,व्ही एम धनशेटृटी,रविंद्र जगदाळे,एस एन ओव्हाळ,डी जी गुडे,जी व्ही कुलकर्णी,के डी नाईक,आर डी येरकळ,एक डी सुरवसे,एम ए चौधरी,के आर जुबेरी,पुनम,ृतिका यादव, दिनेश इंगळे,पांडुरंग भोकरे,माधव टेकाळे,एस व्ही शिंदे,एच डी बोर्डे सह विद्यार्थी उपस्थित होते.प्रस्तावना अब्दुल लतिफ यांनी केली.सुत्रसंचलन प्रा.मनोज चौधरी यांनी तर आभार प्राचार्य एम एस बिरादार यांनी मानले. शेवटी भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.