परंडा (प्रतिनिधी) - येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाची विज्ञान विभागाची विद्यार्थिनी .भाग्यश्री ज्योतीराम मुळे हिने शैक्षणिक वर्ष 2023 - 24 मध्ये 71.76 एवढे मार्क्स घेऊन महाविद्यालयात सर्वप्रथम क्रमांक पटकाविला आहे.

महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अतुल हुंबे यांनी रा. गे. शिंदे गुरुजी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास महाविद्यालय स्तरावर प्रमाणपत्र ट्रॉफी व गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्याचा मानस  केला होता. त्याप्रमाणे भाग्यश्री जोतीराम मुळे या विद्यार्थिनीने विद्यान विभागातून प्रथम क्रमांक पटकाविल्याने तिचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफी व गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी प्राचार्य डॉ.सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अतुल हुंबे, कनिष्ठ विभागाचे प्रा. संतोष भिसे सह महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.

 
Top