धाराशिव (प्रतिनिधी)-येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संचलित गुरुवर्य के. टी. पाटील फाउंडेशन वर्ग यांच्यावतीने गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त व शिक्षक दिनानिमित्त अपूर्व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक  नंदकुमार नन्नवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळचे संस्थाध्यक्ष  सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य  कार्यकारी अधिकारी पाटील आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी  एस.एस. देशमुख, संस्था सदस्य यु. व्ही. राजे, गुरुवर्य के .टी .पाटील फाउंडेशन वर्गाचे प्रमुख प्रा. विनोद आंबेवाडीकर व इयत्ता सातवीचे पर्यवेक्षक आर.बी. जाधव उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. सर्व उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर सी .व्ही .रामन व गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली.       

सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये धाराशिव शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयामधील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून  आपल्या मॉडेलचे प्रदर्शन केले. या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते सातवी गटात 69 प्रयोग तर इयत्ता आठवी ते बारावी गटात 48 प्रयोग विद्यार्थ्यांच्या वतीने मांडण्यात आले होते. या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी पक्षांपासून व वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्याकरिता विद्यार्थ्यांमार्फत तयार करण्यात आलेले मोठा आवाज करणारे उपकरण या प्रयोगाने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये समाज उपयोगासाठी विद्यार्थ्यांमार्फत तयार करण्यात आलेली उपकरणे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. 

या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे शिक्षक विशाल कुमार, सत्यप्रकाश, मृदुल त्रिवेदी, संजय प्रतापसिंह, श्यामजी वर्मा या शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बनवण्याकरिता मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून विशाल कुमार, मृदुल त्रिवेदी  तसेच महाविद्यालयाचे  प्रा. एल. व्ही पवार व कुलकर्णी यांनी काम पाहिले. विज्ञान प्रदर्शनासाठी आलेल्या इतर शाळातील शिक्षकांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आर्या सदाफुले हिने केले. तसेच फाउंडेशन वर्गातील विद्यार्थ्यांनी काही गीतांचे सादरीकरण करून सर्वांस मंत्रमुग्ध केले. शेवटी आभार प्रदर्शन एम.पी. वाघमारे यांनी  केले. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमास सत्यप्रकाश भोजने, समाधान शेटे, सचिन चव्हाण, पाचकूडवे, जगताप, सी. एन. काकडे, जे. बी. शिंदे, ए. बी. देशमुख, राखी गुप्ता, संजय प्रताप, श्यामजी मिश्रा व के. ए. यादव व क्रीडा शिक्षक धीरज लोमटे उपस्थित होते.

 
Top