धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव श्रीराम देशमुख व सुहास श्रीराम देशमुख यांच्या मातोश्री तथा गोवा मुक्तीसंग्रामात योगदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक कै. श्रीराम देशमुख अंबेजवळगेकर यांच्या पत्नी रुक्मिणीबाई श्रीराम देशमुख यांचे दिनांक 8 सप्टेंबर 2024 वार रविवार रोजी वृद्धापकाळाने वयाच्या 94व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर कपिलधार स्मशानभूमी धाराशिव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींची तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील गुरुदेव कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, चार सूना, जावई, दहा नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे.

 
Top