उमरगा (प्रतिनिधी)- संत हे कोणत्याही काम कमी मानत नाहीत, संतांनी सर्वच कार्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम आपल्या संत वचनातून केले आहे. त्यामुळे समाजातील भेदाभेद नष्ट करण्यासाठी आजच्या काळात संत विचार महत्त्वाचा आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार, संत साहित्याचे अभ्यासक सचिन परब यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित कर्मयोगी श्रीधररावजी मोरे व्याख्यानमालेत “संतांचे विचार: काळाची गरज“ या विषयावर बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे चिटणीस पद्माकराव हराळकर हे होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासात या संस्थेचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी भारत शिक्षण संस्थेचे संचालक मा. भानुदासराव माने, मा. राजेंद्र माने, मा. रमेश बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.  याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ .पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे, प्रा.शैलेश महामुनी, डॉ. ढोबळे डी. बी., शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,  शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समाधान पसरकल्ले यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ . धनराज इटले यांनी मानले.

 
Top