उमरगा (प्रतिनिधी)-  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नांदेड जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने नांदेड येथील गुरुगोविंद सिंग जी स्टेडियम मध्ये घेण्यात आलेल्या लातूर विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत उमरगा येथील आर्या शिवदे व चिन्मयी महामुनी यांनी प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. 

धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत उमरगा येथील आर्चरी ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रताप सिंह राठोड आणि साई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्या चे प्रशिक्षण घेत असलेल्या आर्या शिवदे हिने 19 वर्षे वयोगटात इंडियन राउंड मध्ये तर चिन्मयी महामुनी हिने 17 वर्षे वयोगटात इंडियन राउंड मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

 
Top