तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील पापनाश नगर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या होम मिनीस्टर स्पर्धेच्या विजेत्या अश्विनी डोंगरे या ठरल्या.
आयसीसी विवेकानंद गणेश मंडळाच्यावतीने दोन दिवस घेण्यात आलेल्या महा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे विजेतेपद अश्विनि डोंगरे यांना मिळाले. त्यांना मानाची पैठणी व फ्रिज माजी नगराध्यक्षा अर्चनाताई विनोद गंगणे, प्रियंकाताई विजय गंगणे यांच्या हस्ते माजी नगराध्यक्षा भारतीताई गवळी , श्रेयाताई कदम, प्रिया गंगणे, पुजा गंगणे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
प्रथम क्रमांक अश्विनी डोंगरे यांना पैठणी व फ्रिज, व्दितीय क्रमांक आशा दावकरे यांना वॉशिंग मशिन, तिसरे पारितोषिक पायल कसबे यांना 32 इंची टी व्ही, चौथे परितोषक सारिका बडूरे यांना मायक्रो ओहन, पाचवे पारितोषिक साक्षी मने यांना शिलाई मशिन, सहावे परितोषिक राधिका कदम मिक्सर, सातवे पारितोषक सोनाली गायकवाड वॉटर प्युरिफायर, आठवे पारितोषक ऋतुजा गायकवाड कुकर, नवे पारितोषक माधुरी शिंदे डिनर सेट यांना भेटला. या पारितोषिक विजेत्यांना माजी नगराध्यक्षा अर्चनाताई गंगणे, प्रियंकाताई गंगणे, माजी नगराध्यक्षा भारतीताई गवळी, श्रेयाताई कदम, प्रिया गंगणे, पुजा गंगणे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष अक्षय माने, उपाध्यक्ष विशाल बेळंबे, कोषाध्यक्ष पंकज जमादार, सचिव प्रशांत शिंदे, विशेष सहकार्य प्रहर्ष बरुरकर, सुशांत हत्तीकर, अनिकेत दिवटे, वाजेद तांबोळी, ओमकार लोंढे, अजिंक्य जमादार, मिलिंद शिरसट, समर्थ चौगुले, प्रेम कदम, अथर्व भोरे, संकेत जाधव, सत्यम गायकवाड आदिंनी परिश्रम घेतले.