भूम (प्रतिनिधी)- भूम येथील प्राइड इंग्लिश स्कूलमध्ये आज गुलाबी दिन साजरा करण्यात आला.
गुलाबी रंग हा सभ्यता, संविधानशीलता, कोमलता व मोहरतेचा प्रतीक म्हणून वापरला जातो. लहान मुलांना गुलाबी रंगाची जास्त आवड असते. विशेषतः मुलींना गुलाबी रंग खूप आवडतो. विद्यार्थ्यांनी गुलाबी रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख परिधान केले होते. शाळेतला पूर्णता गुलाबी रंगात सजवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त साहित्य गुलाबी रंगाचे आणले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा रॅम्प वॉक घेण्यात आला. तसेच गुलाबी साडी या गाण्यावर विद्यार्थ्यांनी धमाल नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका दिपीका टकले, सेजल सुरवसे, मेघा सुपेकर व भाग्यश्री डांगे यांच्यासह सेविका आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम केले.