धाराशिव (प्रतिनिधी)- भुयारी गटार योजनेमुळे धाराशिव शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट असून, हे रस्ते सुधरले पाहिजेत. यासाठी महायुतीच्या सरकारने धाराशिव नगर परिषदेला 18 कोटी रूपये दिले. शहरातील एक-दोन रस्ते यातून दुरूस्त केलेले दिसत आहेत. बाकी निधी कुठे गेला. आमदार कैलास पाटील यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील रस्त्याबाबत निवडणुकीच्या तोंडावर बैठक घेतली. परंतु या बैठकीनंतरही रस्त्याची का दुरूस्ती झाली नाही? असा प्रश्न उपस्थितीत करत आमदारांने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा द्यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे संघटक सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी सांयकाळी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत सुधीर पाटील यांनी खरी शिवसेना कोणती आहे याचा निवाडा जनता करेल असे सांगत सुधीर पाटील यांनी विद्यमान आमदारांने ठोस असे विकासाचे कोणते काम केले आहे याबाबत माहिती द्यावी असे सांगितले. धाराशिव-कळंब या विधानसभा मतदारसंघातील 128 गावे व 2 नगर परिषद या भागात आमदारांनी आपले संपर्क कार्यालय का चालू केले नाही? असा प्रश्न उपस्थितीत करत  लोकांच्या कामासाठी स्वतः चा आयटी विभाग आणि संपर्क कार्यालय असणे महत्वाचे आहे असा टोलाही सुधीर पाटील यांनी लगावला. 


 
Top