धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील कलाविष्कार अकादमी द्वारा संचलित छंदी गायक मेलडी स्टारच्या वतीने 95 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथम लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पुजन करण्यात आले त्यानंतर मेलडी स्टार चे मुख्य प्रवर्तक युवराज नळे समन्यवक रवींद्र कुलकर्णी विधिज्ञ विद्युलता दलभंजन, विस्तार अधिकारी मल्हारी माने, तौफीक शेख, अनिल मालखरे, मुनीर शेख, धनंजय कुलकर्णी, शेषनाथ वाघ यांनी लता मंगेशकर यांच्या बहारदार गीतांचे गायन केले. मैफील यशस्वीतेसाठी सुंदर यांनी परिश्रम घेतले.