भूम (प्रतिनिधी)- भूम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूम हे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूम हे नाव शासनाने जाहीर केले आहे. याचा नामांतर सोहळा कार्यक्रम आज संपन्न झाला.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील 14 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव बदलून थोर समाजसुधारकांचे नावे देण्यात आले आहेत. यामध्ये भूम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूमचे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे नाव देण्यात आले आहे. आज सकाळी हा नामांतर सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी येथील औद्योगिक संस्थेचे आय एम सी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर ,आय एम सी सदस्य तथा भाजपाचे विधानसभा अध्यक्ष तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब क्षीरसागर , भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार सुनीलकुमार डुंगरवाल प्राचार्य हर्षद राजुरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डॉ शांतीनाथ अंबुरे, शीतलभाई शहा, विवेक पोकर्णा, प्रदीप आहेरकर, सुनीलकुमार दोशी, प्रितम आहेरकर, शांतीलाल शहा, महावीर भोपलकर, सुधीर जोशी, जितेंद्र बांगर, रवींद्र वीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मुळे यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य हर्षद राजुरकर यांनी तर शेवटी आभार जैन संघटनेचे अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल यांनी मानले.