नळदुर्ग (प्रतिनिधी) - शारदीय नवरात्र महोत्सवात नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासुन ते विजयादशमीपर्यंत म्हणजे दि. ३ ते १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ऐतिहासिक नळदुर्ग नगरीतील श्री अंबाबाई मंदिरात श्री अंबाबाई समोर दहा दिवस श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून अनुष्ठान करणार आहेत. हा क्षण पुन्हा पुन्हा येणार नाही त्यामुळे नळदुर्ग शहर व परीसरातील हिंदु बांधवांनी याठिकाणी भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ऐतिहासिक नळदुर्गची भुमी ही पवित्र असुन या भुमिती प्रत्येक्षात हिंदूंचे आराध्य दैवत श्री प्रभु रामचंद्र यांचे पदस्पर्श झाले आहेत. त्याचबरोबर श्री खंडोबा देव व माता म्हाळसा यांचा विवाह याच भुमित झाला आहे त्यावेळी स्वर्गातले संपुर्ण देव या भुमीवर अवतरले होते. त्याचबरोबर श्रीक्षेत्र भीमाशंकर, श्री नागजरी देवस्थान या सर्व तीर्थक्षेत्रामुळे नळदुर्गची भुमी ही पवित्र मानली जात आहे. याच पवित्र भुमित शारदीय नवरात्र महोत्सवात नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासुन ते विजयादशमीपर्यंत म्हणजेच ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून अनुष्ठान करणार आहेत.
या अनुष्ठानाचा शुभारंभ दि. १ ऑक्टोबर रोजी काशीपीठाचे श्रीश्रीश्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी मल्लिकार्जुन मंदिर ते अंबाबाई मंदिरापर्यंत आड्ड पालखी मिरवणुक कुंभ मिरवणुक काढण्यात येणार आहे.दि. ३ ऑक्टोबर रोजी महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज हे छातीवर घटस्थापना करून संपुर्ण १० दिवस अन्न, पाणी व सर्व नैसर्गिक विधीचा त्याग करून एकाच असनात लोक कल्याणासाठी तपस्या करणार आहेत.अनुष्ठान समाप्ती निमित्त श्री महेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते ५१ हजार सिद्ध रुद्राक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. अनुष्ठान कालावधीत याठिकाणी दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यापुर्वी श्री महेश्वरानंद महाराजांनी अशाप्रकारे चार अनुष्ठान केले आहेत. हा क्षण नळदुर्गकरांसाठी अतिशय पवित्र ऐतिहासिक आहे.आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण ठरणार आहोत.या अनुष्ठानामुळे नळदुर्गची भुमी ही पुन्हा एकदा पावन होणार आहे.
या दहा दिवसीय अनुष्ठान कालावधीत श्रीमंत जगद्गुरू सच्चीदानंद शंकराचार्य (कर्नाटक), श्रीश्रीश्री १००८ परमहंस कृष्णानंद कालिदास बाबाजी (हरियाणा), गुरुवर्य किरण भाई जैन (अहमदाबाद) श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी (नागणसुर मठ), श्री समर्थ सद्गुरू प्रभुदेव महाराज (हिप्परगी कर्नाटक), ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सद्गुरू गुरुबाबा औसेकर, ह. भ. प. श्रीरंग महाराज औसेकर, श्री महामंडलेश्वर स्वामी, परमेश्वरानंदजी महाराज (मुंबई), श्री महंत योगी मावजीनाथ बाबा, श्री १००८ महंत काशिगिरी महाराज संन्यासी मंडलाध्यक्ष,श्री महंत आनंद सरस्वतीजी महाराज (मंगळवेढा), श्री संत बंडोपंत महाराज (मंगळवेढा), यांच्या दर्शनाचा लाभ भाविकांना होणार आहे.
त्याचबरोबर दि. ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुंदडा यांची मार्गदर्शन सभा,दि. ६ ऑक्टोबर रोजी ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची मार्गदर्शन सभा,दि. १० ऑक्टोबर रोजी भारत सरकारच्या दुर संचार आणि सुचना प्रौद्योगिक मंत्रालयाचे सल्लागार सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांची मार्गदर्शन सभा,दि११. रोजी हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांची भव्य मिरवणुक व मार्गदर्शन सभा होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ हिंदु बांधवांनी घ्यावा असे आवाहन नळदुर्ग सकल हिंदु समाज बांधवांनी केले आहे.