उमरगा (प्रतिनिधी)-  शिवसेनेचा महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, अध्यक्षा उषा रविंद्र गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती ज्ञानराज चौगुले व शिवाई किरण गायकवाड, युवतीसेना मराठवाडा निरीक्षक ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे ह्या उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतं होत्या. ऐन दसरा सणाच्या काळात कार्यक्रमास एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल महिलांचे आभार व्यक्त केले. महायुती शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुलींचे मोफत शिक्षण, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला 03 मोफत सिलेंडर, बाळंतपणासाठी महिलांना मदत, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना,  व इतर विविध योजनांची महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावे. यापुढे बाहेर, फिरत वावरत असताना घाबरायची गरज नाहीं. कारण आपला लाडका भाऊ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी महीला आघाडी तालुकाप्रमुख संध्या बाळकृष्ण शिंदे, लता भोसले, रुपाली सोनकवडे, विजया चव्हाण, कंटेकुरच्या सरपंच विजय जमादार, बालिका गायकवाड, सरीता पवार, शकुंतला जाधव, अर्चना इंगळे, शारदा इंगळे, रुक्मिणी जाधव, ज्योती माने, कुसुम इंगळे, सविता माने, आशा इंगळे, समीना शेख, शैलजा जमादार, परवीन पटेल आदी व तालुक्यांतील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top