उमरगा (प्रतिनिधी)- येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि विधीज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि 28) राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आलेली होती. सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण पाच पॅनेल करण्यांत आले होते. 

राष्ट्रीय लोक अदालतीत सदर पॅनेलवर भुसंपादन प्रकरणे- 14 (एन.आय-138), धनादेश प्रकरणे 260, मोटार अपघाताची प्रकरणे 32, दिवाणी प्रकरणे 496, फौजदारी प्रकरणे 44, गुन्हा कबुल 233 असे विविध प्रकारचे मिळून (सहा न्यायालयातील नोंदणी झालेले प्रलंबित) एकूण 1079 प्रकरणे ठेवण्यांत आली होती. तसेच दावापूर्व (नोंदणी न झालेले प्रकरणे) भारतीय स्टेट बँक शाखा उमरगा 389 प्रकरणे, भारतीय स्टेट बॅक शाखा माणिकवार कॉम्प्लेक्स 31 प्रकरणे, बँक ऑफ इंडिया शाखा उमरगा 83 प्रकरणे, भारतीय स्टेट बँक शाखा दाळींब 63, भारतीय स्टेट बँक शाखा माडज 147,महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उमरगा 57 प्रकरणे, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तुरोरी 40, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गुंजोटी 67,महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आलुर ची 28, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नाईचाकुर 13, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उमरगा यांची 07 प्रकरणे, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुरूम 74, उमरगा नगर परिषद 48, मुरूम नगर परिषद 81 तसेच पंचायत समिती अंतर्गत ग्राप 19, मातोळा येथील हनुमान ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांची 94, श्रीराम फायनान्स 69 प्रकरणे, विद्युत वितरण कंपनी उमरगा 214 प्रकरणे असे एकूण 1696 प्रकरणे व दावा पूर्व प्रकरण तीन ठेवण्यांत आलेली होते. त्यात विविध प्रकारचे सहा न्यायालयाची मिळून एकूण 1079 प्रलंबित प्रकरणापैकी 128 प्रकरण निकाली निघाले. यात 69 लाख 48 हजार 392. तसेच दावापुर्व एकूण 1696 प्रकरणापैकी 134 प्रकरणे निकाली निघाले. यामध्ये 22 लाख 52 हजार 835 असे एकूण 2778 दाखल प्रलंबित प्रकरणापैकी 262 प्रकरणे निकाली निघालेली असुन तडजोडी अंती संबधितास 92 लाख एक हजार 227 इतक्या रक्कमेत तडजोड झाली. दावापुर्व तीन प्रकरणे निकाली काढण्यात आली. सदर लोकअदालतीत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एच. कर्वे, दिवाणी न्यायाधीश पी. बी. रेमणे, दिवाणी न्यायाधीश जी. पी. बनकर, सह दिवाणी न्यायाधीश एस एच राठी, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती एम. पी. मथुरे आदी न्यायीक अधिकाऱ्यांचे पाच पॅनेल वर नियुक्ती करण्यात आली होती. विधीज्ञ मंडळ अध्यक्ष ॲड एम. पी. कोथींबरे, पंच सदस्य, कर्मचारी नियुक्त केले होते.न्यायालयीन कर्मचारी व तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक डी. सी. कांबळे, कनिष्ठ लिपीक जी. यु. इंगळे, शिपाई के. एस. चिखले यांनी कामकाज पाहिले.

 
Top