धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत सुरू असलेल्या फार्मसी विभागाच्या वतीने वर्ल्ड फार्मासिस्ट डे निमित्त अनेक उपक्रम घेऊन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी  प्रदीप व्हटकर, फार्मसी इन्स्पेक्टर ,औरंगाबाद हेडक्वार्टर,  धनाजी आनंदे, प्रेसिडेंट, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, धाराशिव, रोहित फिसरीकर, तालुकाध्यक्ष, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन धाराशिव,  कुणाल गांधी, कोषाध्यक्ष, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन धाराशिव, विशाल हिंगमिरे, शहराध्यक्ष, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन धाराशिव आणि  मारुती कृपाळ, कोऑरडीनेटर ऑफ केमिस्टअँड ड्रगिस्ट असोसिएशन धाराशिव,तसेच तेरणा ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने आणि फार्मसीच्या विभाग प्रमुख डॉ. प्रीती माने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रदीप व्हटकर यांनी फार्माको व्हिजिलन्स या विषयावर सखोल माहिती दिली. श्रधनाजी आनंदे यांनी सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासंदर्भात फार्मासिस्टचे योगदान कसे महत्त्वाचे आहे हे समजावून सांगितले. त्याचप्रमाणे रोहित फिसरीकर यांनी मुलांना भविष्यात फार्मसीच्या संधीची उपलब्धता याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कुणाल गांधी यांनी ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर संदर्भात माहिती दिली. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यावेळी बोलताना म्हणाले फार्मसी विभागाने अल्पावधीत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ही वाखण्याजोगी असून अनेक विद्यार्थी चांगल्या कंपनीमध्ये प्लेस झालेले आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित अनेक कार्यक्रम वर्षभरामध्ये अभ्यासक्रमा बरोबर आम्ही घेत असून त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक संधी सहज उपलब्ध होत आहेत .तर विभाग प्रमुख डॉ. प्रीती माने यावेळी बोलताना म्हणाल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची प्लेसमेंट व्हावी या उद्देशाने आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्याकडून त्या दृष्टीने तयारी करून घेत आहोत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ही डॉ प्रीती माने यांनी केले. 

*फार्मसी विभागाने इतके नाविन्य पूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, आ.राणाजगजितसिंह पाटील, तसेच मल्हार पाटील, सर्व विश्वस्त, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनी उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले आणि सर्व फार्मासिस्ट यांना शुभेच्छा दिल्या.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राजेश ननवरे, डॉ.गुरुप्रसाद चिवटे, प्रा. सायली पवार, प्रा. राजश्री यादव, व महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .फार्मासिस्ट डे दिनानिमित्त कॉलेजमध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये विविध स्पर्धा जसे की ब्लॉग राइटिंग, व्हिडिओ मेकिंग,निबंध लेखन आणि क्विझ कॉम्पिटिशन यांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण ही करण्यात आले होते.संपूर्ण कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थित होते. फार्मासिस्ट दिवसानिमित्त उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये तेरणा फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही रॅली सांस्कृतिक भवन, धाराशिव पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत आयोजित करण्यात आली होती. रॅलीच्या शेवटी उपस्थित असलेल्या सर्व फार्मासिस्ट यांनी फार्मासिस्ट शपथ देखील घेतली.

 
Top