वाशी (प्रतिनिधी)-यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने,पिके चांगली आल्याने सोमवारी(दि.1) शहरात बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षीच्या पोळा सणाचे वैशिष्ट्य म्हणजे आनंदा बरोबरच उत्साह शिगेला पोचल्याचे दिसून आले. येथील उंदरे परिवाराकडून दरवर्षी सर्जा राजाची सवाद्य,सजावट करून शहरातून मिरवणूक काढण्यात येते.परंतु यावर्षी समाधानकारक पाऊस पडला आहे. याने आनंदित होऊन या परिवाराने डीजे लावून,त्यावर ठेका धरत बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.