धाराशिव (प्रतिनिधी)-येथील भागिरथी परिवार यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी केला.

सर्वप्रथम प्रमुख उपस्थिती असलेल्या सर्व महिला पत्रकार योगशिक्षिका व सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची पूजा व आरती संपन्न झाली. त्यानंतर गणेश उत्सवा निमित्ताने स्त्री शक्तीचा गौरव म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार प्रतिवर्षीप्रमाणे या ही  वर्षी करण्यात आला.

सध्याच्या जीवनशैलीत सध्याच्या अत्यावश्यक असलेले योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या योगशिक्षिका गिलबिले, सुवर्णा माळी, निर्जला माळी, नलिनी मालखरे, श्रीकवर त्रिकोणे, सरोज चव्हाण व महिला पत्रकार शीला उंबरे व संगीता काळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भागिरथी परिवाराची संस्थापक युवा उद्योजक अभिराम पाटील व मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डी. फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य गोरख देशमुख, प्लाईंग कीडस इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल धाराशिवच्या शीतल  शिंदे, प्रज्ञा ठोकळ, आरती उकाडे,पूजा हंगरगेकर व मनोज लोमटे आदी उपस्थित होते.

 
Top