भूम  (प्रतिनिधी)- पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनयम) अधिनियम ऑगस्ट 2016 नियम 14 (2) अंतर्गत पथविक्रेता समिती निवडणूक 2024 ते 2029 पार पडली. यामध्ये विविध आरक्षण वर्गवारीनुसार या उमेदवारांचे अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. नजीर बागवान अल्पसंख्यांक, श्याम तुकाराम वारे सर्वसाधारण, भरत सखाराम काळेकर सर्वसाधरण, संजीवनी चितामणी माळी सर्वसाधरण गट महिला राखीव, सुनील विजय माळी विकलांग, राजुबाई मोहन ओव्हाळ अनुसुचित जाती महिला राखीव, बागवान समीऊरेहमान महमंदनवाज इतर मागास वर्ग निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी शैला डाके यांनी काम पाहिले. यावेळी सर्व उमेदवारांचा भूम नगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश जगदाळे, रवींद्र भोसले सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

 
Top