नळदुर्ग (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाच्या ढगधगत्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या नळदुर्गच्या ऐतिहासिक आलियाबाद पुलाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा. तसेच याठिकाणी देशाचे पहिले अशोक चक्र पुरस्कार प्राप्त शहीद जवान बचित्तरसिंह यांचे भव्य स्मारक उभे राहावे. यासाठी माझा प्रयत्न सुरु असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
दि. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधुन नळदुर्ग येथील मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचा मुक साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक आलियाबाद पुलाचे पुजन व भारतीय शहीद जवान बचित्तरसिंह यांच्या प्रतिमेच्या पुजनाचा कार्यक्रम आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुशांत भुमकर, राजाभाऊ ठाकुर,विलास राठोड,नायब तहसिलदार संतोष पाटील,भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार,शहर भाजपचे अध्यक्ष धीमाजी घुगे,माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, सुनिल बनसोडे, गणेश मोरडे, बबन चव्हाण, अक्षय भोई, संजय विठ्ठल जाधव, विजय ठाकुर,देवानंद बनसोडे, शरद देशमुख, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी ऐतिहासिक आलियाबाद पुलावर शहीद जवान बचित्तरसिंह यांच्या प्रतिमेचे पुजन आमदार राणाजगजितसिंह पाटील व इतर मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोब ऐतिहासिक आलियाबाद पुलाचे पुजनही करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय, मराठवाडा मुक्ती दिनाचा विजय असो अशा घोषणा दिल्या.
यावेळी बोलतांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले की मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनात नळदुर्ग शहर व परीसराचे मोठे योगदान आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचा आलियाबाद पुल हा मुक साक्षीदार आहे. भारतीय सेना आपल्यापर्यंत पोहचु नये म्हणुन निजामाने नळदुर्गचा हा आलियाबाद पुल उडवुन देण्यासाठी पुलाखाली दारूगोळा ठेवला होता. मात्र भारतीय सेनेतील जवान बचित्तरसिंह यांनी तो दारूगोळा नष्ट केला यामध्ये जखमी होऊन ते शहीद झाले. त्यांच्या या शौर्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना देशाचा पहिला अशोक चक्र पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. याठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असुन या स्मारकात नळदुर्ग शहरासह संपुर्ण मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात येणार. हे स्मारक 10 ते 12 एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. जागेच्या कांही तांत्रिक अडचणीमुळे या स्मारकाचे काम सुरु होऊ शकले नाही. या सर्व तांत्रिक बाबी आता दुर झाल्या असुन या भव्य स्मारकाच्या उभारणीच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.