धाराशिव  (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे धाराशिव येथे आले असता शिवसेना संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांच्या हस्ते हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ना शिंदे यांचा फेटा, जेसीबीच्या सहाय्याने अडीचशे किलोचा पुष्पहार घालून व अतिशय उत्साहपूर्वक आणि धुमधडाक्यात यथोचित सत्कार केला.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान व मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर त्यानंतर धाराशिव शहरात शिवसेना मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यापूर्वी आनंद नगर येथील जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या साळुंके कॉम्प्लेक्समधील शिवसेना संपर्क कार्यालयास मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी जिल्हाप्रमुख साळुंके यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा ढोल ताशांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी व गगनभेदी घोषणा देत त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अनिल खोचरे, शिवसेना प्रवक्ते योगेश केदार, युवासेना निरीक्षक नितीन लांडगे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख अजीत लाकाळ, युवा सेना कळंब तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, व्हीजेएनटी जिल्हाप्रमुख कमलाकर दाणे, शिवसेना जिल्हा संघटक रंजीत चौधरी, युवासेना धाराशिव शहरप्रमुख सागर कदम, शिवसेना उपतालुका प्रमुख गोविंदा आवाड, उपतालुका प्रमुख दिनेश पवार, युवासेना कळंब शहरप्रमुख कृष्णा हुरगट, धाराशिव उपशहर प्रमुख रजनीकांत माळाळे, शिव उद्योग सहकारचे जिल्हाप्रमुख सुनील आप्पा शेरखाने, शिव उद्योग महिला जिल्हाप्रमुख सुवर्णमाला पाटील आदींसह पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top