भूम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अभियंता दिन व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम उपविभाग भूम येथे शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभागतील कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी, बांधकाम विभाग धाराशिव येथील सर्व अभियांत्रिकी विभाग व तेथील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन अधीक्षक अभियंता बी.एम.थोरात, कार्यकारी अभियंता एन.व्ही. भंडे व उपविभागीय अभियंता आर.आर.गिराम यांनी केले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी आपली नावे उपविभागीय अभियंता आर.आर.गिराम, मो.8975947204, निष्ठ अभियंता एस.आर. उघडे, मो.8379009783, कनिष्ठ अभियंता एस. पी. जाधवर मो.9404158992
यांच्याकडे नोंदविण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.