नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरात अपर तहसील कार्यालय मंजूर झाल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्यानंतर बुधवार (ता.11) रोजी रात्री सात वाजता महायुतीच्या पदाधिकार्याकडून अर्चना पाटील यांच्या उपस्थितीतफटाके फोडून साखर वाटत जल्लोष करण्यात आला. तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, संविधान चौक येथे फटके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी अर्चना पाटील, सुशांत भुमकर, नय्यर जहागीरदार, धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, संजय बताले, बसवराज धरणे, मुकूंद नाईक, सुनील बनसोडे, सुधीर हजारे, पद्माकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, गणेश मोरडे, सागर हजारे, अब्दुल रिझवी, गौस कुरेशी, संतोष पाटील, सुभाष कोरे यांच्यासह महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी उपस्थित होते.