धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, धाराशिव यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध करण्यात आला.

काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा आणि लोकसभा सदस्य असलेले खा. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे जॉर्ज टाऊन विद्यापीठात प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या समोर बोलताना भारतात आर्थीक व सामाजीक दर्बल घटकांना भारतीय संविधानानुसार असलेले आरक्षण हे वेळ आल्यावर संपवून टाकू असे आरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्तव्या वरुन हेच निदर्शनास येते की, काँग्रेस च्या पोटात असलेले राहुल गांधींच्या ओठातून काल बाहेर आले आहे. अश्या प्रकारचे आरक्षण विरोधी बोलून जे वर्षानुवर्ष वंचित आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. या वक्तव्यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव आहे असे जाणवते. म्हणून अशा आरक्षण विरोधी मानसिकतेचा आम्ही सर्व जण विरोध आणि निषेध करतो आणि या मानसिकतेच्या नेत्यांना सरकारने समज द्यावी अशी या निवेदनातुन मागणी केली.

या वेळी प्रदेश चिटणीस अजा मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिन लोंढे, शंकर मोरे, व्यंकटेश कोळी, ओंकार देवकते, सुरज लोंढे, ऋषी मगर, अमित कांबळे, प्रशांत गायकवाड, अविनाश कांबळे, आप्पा यमगर, गैतम गेजगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top