धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम 14 सप्टेंबर 2024 रोजी परंडा शहरातील कोटला मैदान येथे सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महिला व  बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत उपस्थित राहणार आहेत. भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघ हा पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघ आहे.

या कार्यक्रमास खासदार ओमप्रकाश राजेंनिंबाळकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले व आमदार कैलास पाटील यांना शासकीय पातळीवर निमत्रण देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून परंडाच्या आजचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरविण्यात आले आहे. या महिला सशक्तीकरण अभियानास 50 ते 60 हजार महिला उपस्थितीत राहणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दृष्टीकोनातून जि. प. चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत गेल्या आठ दिवसापासून कार्यक्रमाचे नियोजन करण्यास व्यस्त आहेत. 


सावंत यांच्या घरावर गोळीबार

गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भूम, परंडा, वाशी या मतदारसंघाचा संपर्क दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात काही ठिकाणी मंत्री सावंत यांना काही प्रश्न विचारण्यात आल्यामुळे वादविवादचा प्रसंग घडला. यानंतर शुक्रवार दि. 13 सप्टेंबरच्या पहाटे धनंजय सावंत यांच्या बंगल्यावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या संदर्भात पोलिस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला आहे. धनंजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना गेल्या काही दिवसापासून मी मुख्यमंत्री यांच्या नियोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यात व्यस्त होतो. मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम यशस्वी होणारच आहे. राजकीय मतभेद असावेत. परंतु कुटुंबाला मध्ये आणू नये, असे सांगून पालकमंत्री यांचा नुकताच संपन्न झालेला मतदारसंघाचा दौरा त्यामुळे विरोधकांचा पोटशुळ उठला आहे अशी प्रतिक्रिया धनंजय सावंत यांनी दिली. 

 
Top