तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील क्रांती तरूण गणेश मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात ३८ रक्तदात्यानी रक्तदान केले.
रक्तदान या स्तुत्य उपक्रमास आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन रक्तदान शिबीर आयोजित केल्याबद्दल गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.यावेळी अमोल भातभागे,प्रवीण साळुंके ,नवनाथ पसारे ,विशाल नाईकवाडी ,अमोल कासार, शरद मेंगले ,आकाश लोखंडे, शितल बुबणे मयूर भातभागे ,सुमित भातभागे, काका काळे, माऊली मुळे ,राहुल पवार, राहुल गाडे, सोन्या काळे, किरण चव्हाण ,अमर गोडसे ,बंटी निर्मळ, अजित मोरे, सुरज गाडे व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.