नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील उमाकांत मिटकर यांचा तेलंगणा राज्याचे महामहीम राज्यपाल जिष्णू वर्मा यांच्या हस्ते हैदराबाद येथील रेडिसन ब्लू हॉटेल मधील सभागृहात सन्मान करण्यात आला. 

मैत्री पीस फाउंडेशनच्या माध्यमातून सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या फाउंडेशनचे अध्यक्ष भन्ते सुरजित बरूआ हे त्यांच्या संस्थेतर्फे देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करतात.यावर्षी त्यांचा कार्यक्रम हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला होता.

उच्चशिक्षित असूनही कोणतीच नोकरी न करता मिटकर हे गेल्या वीस वर्षापासून समाजाच्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करत असून याच कामाची दखल घेऊन त्यांची पोलीस प्राधिकरणावरही निवड झाली आहे. डिव्हाईन जस्टिस नावाचेत्यांचे आत्मचरित्र तीन भाषेत प्रसिद्ध झाले आहे. संपूर्ण कार्यक्रमात मिटकर यांचा महामहीम  राज्यपालांसोबत विशेष अतिथी म्हणून व कार्याचा देखील गौरव करण्यात आला यामुळे मिटकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 
Top