सोलापूर (प्रतिनिधी)- रेल्वेने आगामी सणासुदीच्या काळात मुंबई हुन  लातूर ला  प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी मागणी लक्षात घेता तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दिवाळी या सणांमध्ये आठ सेवांसाठी उत्सव विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः

गाडी क्र. 01105/01106  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लातूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  साप्ताहिक विशेष (८सेवा), गाडी क्र. 01105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -लातूर विशेष एक्सप्रेस (4 फेरी) अधिसूचित  दिनांक पासून  18.10.2024 ते  08.11.2024  रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  स्थानकाहून शुक्रवारी  रात्री  00.30 वा निघणार आणि त्याच  दुपारी  11.40 वाजता ला लातूर  रेल्वे स्थानकावर पोहचणार. 

गाडी क्र. 01106 लातूर-  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष एक्सप्रेस (4 फेरी) अधिसूचित  दिनांक पासून  18.10.2024 ते  08.11.2024  रोजी लातूर  स्थानकाहून शुक्रवारी संध्याकाळी 04.30 वा निघणार आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे 04.10 वाजता ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोहचणार. 

थांबे: दादर, ठाणे, कल्याण , लोणावळा, पुणे, उरली, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव (उस्मानाबाद), हरंगुळ आणि लातूर असे असतील.  संरचना: दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, 08 शयनयान, 06 जनरल, 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन सह एकूण 18 डब्बे असतील.  आरक्षण: उत्सव विशेष ट्रेन क्रमांक 01105/01106 यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. 05.09.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे

 
Top