कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय  गुणवंत विद्यार्थी ,आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी ए मैदर्गी, प्रमुख पाहुणे प्रा .डॉ जयद्रत्त जाधव प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. महादेव गव्हाणे, संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल ,प्राचार्य एस व्ही पवार प्रा. अंकुश पाटील ,प्रकाश शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी विद्याभवन हायस्कूल  या प्रशालीतील मराठी विभाग प्रमुख उपक्रमाशील सहशिक्षक सोपान पवार लिखित ' निबंध लेखन स्वरूप आणि दिशा' व 'निबंध लेखनाची प्रेरणा आणि नवदिशा' या दोन पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 
Top