परंडा (प्रतिनिधी) --जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय कडून आयोजित केलेल्या पावसाळी क्रिडा स्पर्धा मध्ये जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथील विद्यार्थिनी कुमारी दिक्षा सतीश जाधव (वर्ग 9 वी ) हिने जिल्हा स्तरावर जुदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथे मुख्याध्यापक दिनकर पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दिक्षा तिला चंद्रकांत सुरवसे,भाऊसाहेब सुर्यवंशी ,आबासाहेब माळी,शुभांगी देशमुख,मीनाक्षी मुंडे,गीता मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शीतल मोहिते व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.