धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ ,मानाचा गणपती' धाराशिवचा महाराजा  गणला गेलेल्या श्री च्या  पूजा विधीसाठी माजी आमदार व धाराशिवचे भूषण उत्कृष्ट भाषण पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. मंडळाच्या वतीने आमदार ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते श्री ची पूजा विधि करीत असताना विविध धर्मग्रंथांची व संविधानाची पूजा करण्यात आली .काशिनाथ दिवटे यांच्या सुरेल आवाजामध्ये विविध आरती व मंत्र उच्चाराणे भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाली. सत्कारास आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत असताना ठाकूरयांनी मंडळाच्या विषयी व साठ वर्षाच्या या कालावधी विषयी हे कार्य जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून महाराष्ट्रातले परंपरागत संस्कार व संस्कृती टिकून आदर्श कार्य मी पाहत आलो आहे. मला अभिमान आहे की या मंडळामध्ये जे कार्यकर्ते काम करतात ते सर्व आपापल्या क्षेत्रांमध्ये  उत्कृष्ट कार्य  करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मंडळाच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेले आहे .निस्वार्थ , त्याग व खरी भक्ती मला येथे दिसून आली. समाजसेवा कशाला म्हणतात हे या ठिकाणी मंडळाच्या दैनंदिन कार्यक्रमातून दिसून आलेले आहे. वंचित -दुर्लक्षित या घटकांच्या कडे फार मोठे लक्ष देऊन पूजाविधी मध्ये सहभागी करणं व त्यांच्या कार्याचा सन्मान करणे. 

शंभर एक दिव्यांग मुलं-मुली ,मूकबधिर अंध  ,अपंग मतिमंद इत्यादी सर्व या पूजा विधीच्या आनंदामध्ये सहभागीदम करून अनेक वर्षापासून घेत आले आहेत  चेहऱ्यावर आनंद दिगुणीत केला आहे या सर्व दिव्यांगाना आमदार साहेबांच्या शुभहस्ते टॉवेल व खाऊ मंडळाच्या वतीने देण्यात आले. दत्तात्रय टेकाळे आफ्रिकेतील मॅरेथॉन शर्यतीत सहभाग, स्पर्धेचे अंतर 89 किलोमीटरचे पूर्ण करणारे.

 भारतीय रेल्वेमध्ये  व्हॉलीबॉल खेळाडू, टीसी पदावरून सीटीसी या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल मारूती जान गवळी सन्मान.  

एसटी महामंडळात आगारप्रमुख या,पदावरून विभागीय वाहतूक अधिकारी या पदावर झाल्याबद्दल अभियंता दिन साजरा करताना नुकतेच इंजिनिअरिंगची पदवी घेणारे दुर्गेश दिवटे युवा इंजिनिअरिंग मध्ये नुकताच प्रवेश मिळालेले होऊ घातलेले इंजिनियरविश्वेश्वर जाणगवळी यांचा सन्मान आमदार साहेब व दत्ता कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर अभिजीत बंदरकर व वाघमारे सहाय्यक  निबंधक मुंबई गेली गणेश उत्सवामध्ये सर्वांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसाद वाटप एडवोकेट महेश कठारे व त्यांचा परिवार तीस कारागृहामध्ये कैद्यांच्या परिवर्तनासाठी   किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याचे कार्य करणाऱ्यां महेश झरकर महाराज यांचा सन्मान मंडळाच्या वतीने या सर्व मान्यवरांचा व त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्यासारख्या सामान्य माणसांनी घ्यायला हवा आहे जे आपल्या भाषणातून मार्गदर्शन ठाकूर यांनी केले मंडळाच्या वतीने शेला , व सन्मान चिन्ह व श्री ची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. काशिनाथ दिवटे, मनमत पाळणे, प्रा.गजानन गवळी,डॉ.नायगावकर संजय पाळणे  विद्यानंद साखरे, विश्वास दळवी ,वरुण साळुंके ,इ.लहान थोर कार्यकर्ता यशस्वीते साठी परिश्रम घेत आहे.भालचंद्र हुच्चे यांनी सूत्रसंचालन  आभार राजकुमार  दिवटे यांनी मानले.शोभेची दारू व फटाक्याच्या आतषबाजीत समारोप झाला.

 
Top