धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील  प्रसिद्ध व नामांकित उद्योजक सन ग्रुपचे तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तळमळीचे कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य संजय बाजीराव देशमुख वय (52) वर्षे यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. त्यांच्यावर काटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धाराशिव व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर तुळजापूर तालुक्यातील काटी येथील देशमुख बंधूंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सन ग्रुपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटत धाराशिव जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.17 रोजी हजारो लोकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

 
Top