धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा समाज बांधवाच्या घरी जाऊन सुधीर अण्णा पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मुलगा गेल्याचे दुःख कुठल्याही सांत्वन किंवा भेटीत भरून न निघणारे आहे. मात्र, एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी आज पीडित कुटुंबाला धीर देण्याचं काम केले. तसेच, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावतीने मराठा बांधव कुटुंबाला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत केली. अर्थात, ही मदत कुठलंही दुःख हलकं करू शकणार नाही. मात्र, बलिदान दिलेल्या माझ्या भावाच्या कुटुंबाप्रति सहवेदना व्यक्त करण्याचा एक आहे. त्याचप्रमाणे या बलिदान देणाऱ्या बांधवाच्या लहान भावाला नोकरी देतो असे आश्वासन दिले.
धाराशिव जिल्ह्यातील कोंबडवाडी येथील परमेश्वर राजेंद्र मिसाळ या तरुण मित्राने 13 सप्टेंबर रोजी पहाटे 1 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील मराठा बांधवांसोबत व कार्यकर्त्यासोबत संध्याकाळी मराठा आरक्षणाविषयी चर्चा केली होती. परमेश्वर हा सतत मराठा आरक्षण बाबत चर्चा करत होता, तसेच मराठा आरक्षण बैठकीस जात होता. अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी सांत्वन भेटीत दिली. त्यावेळेस आई उषाबाई मिसाळ , मोठा भाऊ रामेश्वर मिसाळ, आत्या यमाबाई कदम व इतर सदस्य तसेच गावातील शिवसेना कार्यकर्ते साहेबराव मिसाळ, नवनाथ सुरवसे मुकुंद सोकांडे, बाळाराम मिसाळ, रामचंद्र मिसाळ, शुभम भोईटे, अमर सोकांडे, कृष्णा घाडगे वाकुरे काका, पापा देशमुख, इत्यादी त्यांच्या घरी होते. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी सदैव समाजबांधवांसोबत असल्याचा शब्द देतो.